फेसबूकच्या त्या पोस्टमुळे
नव्यानं आपली ओळख झाली
एकमेकांना मॅसेज पाठवत
मैत्रीला आपल्या सुरुवात झाली
माझे हसणे तुला आवडे
तुझे रुसणे मला आवडे
बंध आपल्या मैत्रीचे
प्रेमाच्या रूपात तयार झाले
नकळत कुणी डाव मांडला
प्रेमावर आपल्या घाव साधला
क्षणांत तुझे प्रेम संपले
हृदय माझे तेथेच थांबले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा