मित्राच्या लग्नाला आलो होतो
तुझ्याच गावातला पाहुणा बनून
बेधुंद होऊन स्वतःलाच विसरलो
नाचताना तुला मांडवात पाहून
संगीताच्या तालावर ठेका देत
मनमुराद तू नाचत होतीस
नजरेनं हळूच अधून - मधून
चोरून माझ्याकडे पाहत होतीस
मनात एकच विचार आला
तुझ्याशी एकदा बोलून बघावं
प्रेमाचं माझ्या गुपित सारं
समोर तुझ्या मांडून बघावं
भीती वाटत होती मनाला
काय वाटेल तुझ्या भावाला
गावातला पाहुणा बनवून मला
त्यानेच तर बोलावलं होतं लग्नाला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा