रात्री एक स्वप्न पाहिलं
स्वप्नात सोनेरी राज्य बांधलं
राज्याचा राजा होतो मी
राज्याची राणी होतीस तू
दास - दासिणी सोबतीला
नोकर - चाकर सेवेला
राज्याच्या चौफेर दिशेला
तत्पर सैनिक दक्षेला
अवचित राज्यावर संकट आलं
कुण्या शत्रूनं आक्रमण केलं
क्षणांत राज्य नाहीसं होऊन
स्वप्न माझं तेथेच दुभंगलं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा