शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

या वेड्याचं स्वप्न..!

येता-जाता रस्त्यात चालताना 
सतत तुझाच विचार करणं 
ओळख पाळख नसतानाही 
सारखं सारखं तुलाच बघणं 

कळत नाही वळत नाही 
मला असं हे जगणं 
तुलाही कदाचित ठाऊक असेल 
माझं असं हे वागणं 

बोलणं तुझं साधंभोळं 
साधंसुधं तुझं राहणं 
तुझ्यासोबत आयुष्य जगावं 
हेच या वेड्याचं स्वप्न 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...