गुरुवार, २ जानेवारी, २०२०

बालपणीची मैत्रीण..!

खूप सुंदर होती ती
हसऱ्या - लाजऱ्या स्वभावाची

आई - बाबांची लाडकी ती
जशी बाहुली खेळण्यातली

मला नेहमी वाटायचं
तिला मनातलं सांगावं

थोडं प्रेमाचं बोलून
मन हलकं करावं

एक दिवस ठरवलं
सर्व तिला सांगावं

गुपित माझ्या प्रेमाचं
समोर तिच्या मांडावं

हिम्मत होत नव्हती
तिला तसं सांगायची

बालपणीची मैत्रीण मला
सहज नव्हती गमवायची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...