रविवार, १२ जानेवारी, २०२०

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं
बोलता बोलता भांडण करणं

मला खूप आवडतं गं

तुला चिडवणं तुला रडवणं
उदास झाल्यास तुला मनवणं

मला खूप आवडतं गं

तुझा हात धरणं तुला मिठीत घेणं
अलगद गालाचं चुंबन घेणं

मला खूप आवडतं गं

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

प्रेयसी माझी अप्सरेवाणी..!

शिल्पकाराच्या मूर्तीसारखी
देवाने तिला घडवली

गुलाबाच्या फुलांसारखी
सुगंधात ती दरवळली

स्वतःचे दुःख लपवणारी
सर्वांच्या सुखात वावरणारी

थोडीशी लाजरी थोडीशी हसरी
चार - चौघींत शोभून दिसणारी

कीर्ती तिची अफाट न्यारी
जाणून गेली दुनिया सारी

माझ्या नशिबी अवतरणारी
प्रेयसी माझी अप्सरेवाणी

गुरुवार, ९ जानेवारी, २०२०

गावाचा मला अभिमान आहे..!

एक छोटंसं गाव आहे
सुंदर त्याचं नाव आहे
त्या गावातल्या एका घरात
माझंही छोटंसं कुटुंब आहे

सणवार असो वा सुट्टीचे दिवस
गावकरी माझे एकत्र जमतातनि
विविध सार्वजनिक कार्यक्रम ठेवून
गावच्या रीती - परंपरा जपतात

गावात अनेक बिऱ्हाडं राहतात
छोट्या - मोठ्यांचा सन्मान करतात
सुख - दुःखात सहभागी होऊन 
सर्वांची आपुलकीने काळजी घेतात

मी त्या मातीचा पुत्र असल्याचा
मनात माझ्या गर्व आहे
जगाच्या काना - कोपऱ्यात का असेना
गावाचा मला अभिमान आहे

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

सोनपरी..!

तुझ्या सौंदर्याचे तेज पाहून
सूर्य गालातल्या गालात लाजतो

तुझ्या नितळ डोळ्यांना पाहून
चंद्रही आभाळाच्या कुशीत निजतो

तुझ्या मंजुळ आवाजाने
कोकिळेला कंठ फुटेना

नक्षत्रावानी काया तुझी
मोहही माझा मिटेना

मला पडणाऱ्या स्वप्नातली
सुंदर सोनपरी आहेस तू

रात्र असो वा दिवस असो
स्वप्न रंगवून जातेस तू

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

प्रेमळ तुझी आठवण..!

बसलो होतो समुद्रकिनारी
हात जोडून आकाशात बघत

तुला दिलेल्या दुःखाबद्दल
क्षमा स्वतःची देवाजवळ मागत

थंड हवेची झुळूक आली
देहाला माझ्या स्पर्शून गेली

प्रेमळ तुझ्या आठवणींनी
पुन्हा एकदा रडवून गेली

पाप - पुण्य..!

गेल्याजन्मी काहीतरी
पुण्य केलं असेल मी

म्हणून तुझ्यासारखी प्रेयसी
आयुष्यात माझ्या आली

पुण्याबरोबर थोडंसं
पापही केलं असेल काही

म्हणून जीवनाच्या वाटेवर
अर्ध्यावरती सोडून गेली

तो दिवस खास होता..!

तिला समोरून येताना पाहून
श्वास माझा गेला गुदमरून 

नजरेला माझ्या नजर भिडवून
बाजूने गेली ती गालात हसून

तो दिवस खास होता
मनात तिचाच ध्यास होता

विचार केला तिला सांगावं
मनातलं माझ्या गुपित कळवावं

परत फिरलो तिच्या मागून
सांगण्यास तिला आलो धावून

अचानक आलं मन गहिवरून
दुसऱ्याच्या मिठीत तिला पाहून

मला खूप आवडतं गं..!

तुला भेटणं तुझ्याशी बोलणं बोलता बोलता भांडण करणं मला खूप आवडतं गं तुला चिडवणं तुला रडवणं उदास झाल्यास तुला मनवणं मला खूप आवडतं गं तुझा हात ध...